हिंगणघाट: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मंडल यात्रा:ओबीसी आरक्षणावर भर:उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाट येथे मंडल यात्रा उत्साहात पार पडली. या यात्रेचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष (ओबीसी सेल) राजाभाऊ राजापुरकर यांनी केले. कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अतुल वांदीले यांची प्रमुख उपस्थिती होती.आठवडी बाजारात कॉर्नर सभा घेण्यात आली. कार्यक्रमाला तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून यात्रेला भर घातली.