हिंगणघाट: वाघोली येथील नारायण महाराज मंदिराजवळ आंघोळीला गेलेल्या इसमाचा नाल्यात बुडून मृत्यू
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली गावाजवळ नारायण महाराज मंदिराजवळ असलेल्या नाल्याच्या पाण्यात बुडवून इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली असून मृत्यकाचे नाव विक्रम वैतागे राहणार वाघोली असे आहे.प्राप्त माहितीनुसार मृत्यक विक्रम हा १३ ऑगस्टला सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गावाजळील नाल्यावर आंघोळ करीता गेला होता.मात्र तो रात्रीपर्यंत घरी आला नाही यामुळे त्याचे नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही अंधार पडल्याने शोध कार्य थांबविले.