नाशिक: अंबड भागातील म्हाडा कॉलनी, साईबाबा मंदिराच्या येथे गळफास घेऊन तीस वर्षे इसमाने केली आत्महत्या
Nashik, Nashik | Nov 30, 2025 अंबड भागातील म्हाडा कॉलनी, साईबाबा मंदिराच्या येथे गळफास घेऊन तीस वर्षे इसमाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून अंबड पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अमोल ज्ञानेश्वर चौधरी राहणार म्हाडा कॉलनी, साईबाबा मंदिराच्या बाजूला, चुंचाळे शिवार यांनी राहत्या घरात किचनमध्ये फॅनच्या हुकाला साडी बांधून गळफास घेतला.औषध उपचारासाठी त्यांचा भाऊ विशाल चव्हाण यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.