भिकुंड नदीत बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह मध्यरात्री शोधला; बचाव पथकाची धाडसी मोहीम यशस्वी...
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कोळासा गावातील 55 वर्षीय देवराम तोताराम घोंगे यांचा भिकुंड नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरे आणण्यासाठी नदी पार करत असताना ते बेपत्ता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
सायंकाळी गुरे घरी परतली, मात्र देवराम घोंगे परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, नदीत त्यांचा ट्युब आणि वैयक्तिक वस्तू आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत अथक प्रयत्न करत शोधमोहीम राबवली.
अखेर 5 जून रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास नदीतील 20 ते 25 फूट खोल पाण्यातून देवराम घोंगे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या धाडसी मोहिमेत बचाव पथक, पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
व्हिडिओ 🎥 : महाव्हाईस न्यूज डेस्क
#Akola #Balapur #RiverAccident #RescueOperation #MaharashtraNews #DisasterManagement #SearchAndRescue #LocalNews #IndiaNews