उरुळी कांचन येथील एका बड्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल...
.
.
उरुळी कांचन: पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरातील एका नामांकित आणि बड्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा भररस्त्यातील हाणामारीचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात आणि पालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महाविद्यालयाबाहेर काही विद्यार्थिनींमध्ये आधी किरकोळ वाद झाला. मात्र, हा वाद पाहता-पाहता इतका टोकाला गेला की त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. व्हायरल व्हिडिओमध्ये काही विद्यार्थिनी एकमेकींचे केस ओढून आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना स्पष्टपणे दिसून येत आहेत. भररस्त्यात चाललेला हा राडा पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वाद नेमका कोणत्या कारणावरून पेटला, हे अद्याप समजू शकलेले नाही.उरुळी कांचन परिसरातील एका नामांकित कॉलेजच्या विद्यार्थिनी अशा प्रकारे भररस्त्यात भिडल्याने कॉलेज प्रशासनाच्या शिस्तीवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून उलटसुलट चर्चा सुरू असून, कॉलेज प्रशासनाने आणि पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
.
.
.
#UruliKanchan #PuneNews #CollegeFight #ViralVideo #PuneCrime #LoniKalbhor #BreakingNews #HavaliTaluka #CollegeLife #MaharashtraUpdates #PuneUpdates
Haveli, Pune | Jul 2, 2026