तुमसर: तुमसरात नेहरू नगरमध्ये ४८,५९० रुपयांचा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल!
भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत तुमसर येथील नेहरूनगर येथे एका आरोपीकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला एकूण ४८,५९०/- रुपये किमतीचा सुगंधीत तंबाखूचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान पो. उप. नि. पाटील, स्था. गु. शा. भंडारा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्यांनी पंचांसह महेश गंगाधर पारडकर (वय ४७, रा. नेहरूनगर, तुमसर) यांच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान जिन्याखालील प्लास्टीकच्या चुंगळ्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच