जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ विभागातील इगतपुरी-भुसावळ दरम्यान कसबे सुकेने आणि खेरवाडी रेल्वे स्थानकांवर यार्ड पुनर्रचनेच्या कामासाठी ३० सप्टेंबर रोजी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे ६ मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर काही गाड्यांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे. या ब्लॉकमुळे जळगाव, भुसावळ, नाशिक आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive