पोलादपूर: रायगडमध्ये उन्हाचा कडाका ! तापमान ३६ अंशांवर, नागरिकांना इशारा
गेले तीन दिवस रायगड जिल्ह्यात चटके जास्त बसत आहेत. तापमान सुमारे ३६ अंश सेल्सियसच्यावर गेले आहे. ऊन वाढल्याने रायगडकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठांसह रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पेण माणगाव, महाड, पोलादपूर, खालापूर, सुधागड पाली मध्ये सर्वाधिक तापमान असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागात हवेत गारवा असला, तरीदेखील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.