पोलादपूर: रायगडमधील धरणांमध्ये फक्त 21 टक्के पाणीसाठा
रायगडकर पावसाच्या प्रतीक्षेत असताना रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाणीसाठा घटले आहे. रायगड पाटबंधारे विभागा अंतर्गत येत असलेल्या जिल्ह्यात सरासरी 20.72 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी (2025) याच दिवशी 28.06 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील फणसाड धरणाने तळ गाठले आहे तर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीसाठा तळा तालुक्यातील वावा धरणक्षेत्रात 53 टक्के एवढा आहे.