पालघर: खासदार डॉ.हेमंत सवरांनी धाकटी, डहाणू डहाणू परिसरात अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या किनारपट्टी भागाची केली पाहणी
पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धाकटी डहाणू, डहाणू परिसरात अवकाळी पावसामुळे मच्छिमार बोटी व साधनसामग्रीचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागाची पालघरचे खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी संबंधित प्रशासकीय अधिकारी, मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी, मच्छिमार, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना खासदारांनी दिल्या.