पालघर: आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित- आमदार राजन नाईक
वसई विरार महानगरपालिकेच्या रखडलेल्या विकासकामांबाबत तसेच वाढीव पाणीपट्टी, घररपट्टीच्या विरोधात नालासोपाराचे आमदार राजन नाईक गुरुवारी धरणे आंदोलन करणार होते. आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे आमदार राजन नाईक यांनी सांगितले आहे. महापालिकेने दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे कार्यवाही न केल्यास आगामी काळात आंदोलन केले जाईल असे देखील राजन नाईक यांनी सांगितले आहे.