पालघर: वसई रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे पोलिसांनी काढला रूट मार्च
पश्चिम रेल्वेच्या वसई रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे पोलिसांनी रूट मार्च काढला. वर्तमान परिस्थितीच्या अनुषंगाने रेल्वे पोलिसांमार्फत काढण्यात आलेल्या या रूट मार्चमध्ये वसई रेल्वे पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी, महिला कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले. वसई रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म, सर्क्युलेटिंग, एफओबी रूट परिसरात हा रूट मार्च काढण्यात आला.