पालघर: जिल्ह्यात ८ मे रोजी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तीस ते चाळीस किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.