शहादा: शहादा-दोंडाईचा रस्त्यावर संविधान चौकात पोलिसांनी 33 लाख 60 हजार रुपये किमतीच्या दारूसाठा व दहा लाखांचे वाहन केले जप्त
शहादा- दोंडाईचा रस्त्यावरील संविधान चौकात शहादा पोलिसांनी 33 लाख 60 हजार रुपये किंमतीचा दारूसाठा दहा लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सचिन कापडे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात 10 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा मुद्देमाल पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला.