शहादा: शहरातील हॉटेल आकाश जवळ दारू पिऊन एकमेकांकडे पाहिल्याच्या कारणावरून आपसात हाणामारी, दोन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
शहादा शहरातील हॉटेल आकाश समोरील रस्त्यावर दारूच्या नशेत एकमेकांकडे पाहिल्याने दोघांमध्ये आपसात हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत अधिक माहिती अशी की दिनेश लक्ष्मण वाडीले रा.भवानी चौक कुकडेल ता. शहादा व विकास बापू खाडे राहणार सदाशिव नगर शहादा या दोघांमध्ये दारूच्या नजरेत एकमेकांकडे पाहिल्याने आपसात हाणामारी झाली.