शहादा: लोणखेडा चौफुलीजवळ उधार आईस्क्रीम देण्यास नकार दिल्याने एकास कड्याने मारहाण केल्याप्रकरणी शहादा पोलिसात गुन्हा दाखल
शहादा येथील लोणखेडा चौफुलीजवळ उधार आईस्क्रीम देण्यास नकार दिल्याने एकास कड्याने मारहाण केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणखेडा येथील आकाश कोळी याने लोणखेडा चौफुलीजवळ निंबा राजाराम देवासी याच्याकडे आईस्क्रीम उधार मागितली. निंबा देवासी याने उधार आईस्क्रीम देण्यास नकार दिला. या कारणावरुन आकाश कोळी याने हाताच्या कड्याने व हाताबुक्क्यांनी निंबा देवासी यास मारहाण केली. तसेच जिवेठार मारण्याची धमकी दिली.