शहादा: मतदार जनजागृतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत मॅरेथॉन स्पर्धा
शहादा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे मतदार जनजागृतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते दोंडाईचा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत बुधवारी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यात मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार दीपक गिरासे, गटशिक्षणाधिकारी डॉ. सुभाष साबळे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे व इतर मान्यवर उपस्थित होते.