पेण: बालकांचा पोषण आहार होणार चवदार; घरपोच आहारात नव्या पाककृतींचा समावेश
Pen, Raigad | Jun 22, 2026 अंगणवाडीतील बालकांसह गरोदर महिला, स्तनदा माता; तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामध्ये पोषणमूल्यांसोबतच चवीलाही प्राधान्य देत नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत राज्यातील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.