लाखांदूर तहसीलवर कम्युनिस्ट पक्षाचा विराट मोर्चा! निराधार, सिंचन व रोजगारासाठी एल्गार
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तहसील कार्यालयावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात तालुक्यातील 35 गावांतील 500 हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
मोर्चादरम्यान संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे, सिंचनासाठी धरणाचे पाणी, आरोग्य सुविधा आणि स्थानिकांना रोजगार या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या.
संग्रामे हॉल येथून निघालेला मोर्चा घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर पोहोचला. सभेत पक्षाच्या नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. अखेरीस तहसीलदार वैभव पवार यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा.
💬 तुमचे मत Comment मध्ये नक्की सांगा.
🔔 महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी Channel Subscribe करा.
टाइम्स ऑफ महाराष्ट्र
#Lakhandur #CPI #MaharashtraNews #Protest #SanjayGandhiNiradhar #ShravanBalYojana #Employment #Irrigation #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Jun 27, 2026