३ हजार किलो तर्री पोह्यांचा महाविक्रम..! शेफ विष्णू मनोहरांनी नागपूरची चव पोहोचवली जागतिक पातळीवर...
'जागतिक पोहा दिना'निमित्त नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल ३,००० किलो तर्री पोहा तयार करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
नागपूरच्या खाद्यसंस्कृतीची ओळख जगभर पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाची शहरभर चर्चा रंगली.
बजाज नगर येथील 'विष्णूजी की रसोई' येथे पहाटेपासूनच विक्रमी तर्री पोहा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. नागपूरच्या खास झणझणीत चवीचा तर्री पोहा नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी हजारो खाद्यप्रेमींनी या विक्रमी पदार्थाचा आस्वाद घेतला.
शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले की, नागपूरचा तर्री पोहा हा केवळ पदार्थ नसून शहराची ओळख आणि अभिमान आहे. नागपूरला भेट देणाऱ्या प्रत्येकाने 'तर्री पोहे' नक्कीच चाखून पाहिले पाहिजेत. प्रथिनयुक्त चण्यांच्या तर्रीमुळे या पदार्थाला एक वेगळीच खास चव प्राप्त होते. ही एक अशी खास डिश आहे, जिच्याबद्दल अनेकांना माहिती नाही. या उपक्रमामुळे नागपूरच्या खाद्यसंस्कृतीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
🎥 (व्हिडिओ सौजन्य) : ANI (X)
#TarriPoha #Nagpur #VishnuManohar #WorldRecord #PohaDay #FoodLover #MaharashtraFood #IndianCuisine #TrendingNews