पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी 19 फेब्रुवारी ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा एनडीपीएस सेलने शहरात अमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी मोहीम राबवत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल १ कोटी ३ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.