पुण्यातील लोहेगाव येथील पोर्वाल रोडवर असलेल्या लंबोदर खाऊ गल्लीतील 'मेसर्स झेप्टो लिमिटेड' (Zepto) या प्रसिद्ध ऑनलाइन डिलिव्हरी कंपनीच्या डार्क स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा नियमांचे अत्यंत गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी या केंद्राचे कामकाज तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
१३ ऑगस्ट २०२६ रोजी अन्नसुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तपासणी केली. या मोहिमेदरम्यान अन्नसुरक्षा कायदा आणि 'शेड्यूल-४' मधील नियमांची पायमल्ली होत असल्याचे उघडकीस आले.
शीतगृह आणि गोठवलेल्या अन्नपदार्थांच्या साठवणुकीत योग्य तापमान न राखणे, काही खाद्यपदार्थ 'यूज बाय' तारखेनंतरही साठवून ठेवणे, FIFO/FEFO पद्धतीची योग्य अंमलबजावणी न करणे, अस्वच्छ साठवणूक, अपुरी कीटक नियंत्रण व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेतील त्रुटी आढळल्याचे सांगण्यात आले.
कंपनीकडून देण्यात आलेले स्पष्टीकरणही स
Pune City, Pune | Aug 15, 2026