जाफराबाद: तहसील कार्यालय येथे बेमुदत साखळी उपोषणाला पॅंथर युवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात यांनी भेट दिला पाठिंबा
आज दिनांक ४ जुलै 2026 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद तहसील कार्यालय येथे सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला पॅंथर युवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात व नगरसेविका रीमा काळे खरात यांनी भेट देत पाठिंबा दिला आहे, या उपोषणाचे कारण म्हणजे सरकार अनुसूचित जातीच्या आरक्षणांमध्ये अबकड वर्गीकरण करू पाहत आहे त्यामुळे आरक्षण संपेल आणि आरक्षण वाचवण्यासाठी जाफराबाद येथे बौद्ध समाज बांधव बेमुदत साखळी उपोषण करत असून त्या उपोषणाला हा पाठिंबा देण्यात आला आहे.