भारतीय नौदलाचा ऐतिहासिक टप्पा! राफेल मरीनची INS विक्रांतवर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी लँडिंग
भारतीय नौदलाने २९ ऑक्टोबर रोजी सागरी हवाई क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण यश मिळवले. राफेल मरीन लढाऊ विमानाने स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतवर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी लँडिंग केले.
नौदलाने या ऐतिहासिक चाचणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मर्यादित फ्लाइट डेकवर विमानाचे यशस्वी लँडिंग हे नौदल वैमानिकांच्या कौशल्याचे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरले आहे. या चाचणीमुळे भारतीय नौदलात राफेल मरीन विमानांचा समावेश आणि कार्यान्वयन प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
#IndianNavy #RafaleMarine #INSVikrant #DefenceNews #IndianDefence #भारत #भारतीयनौदल