हिंगणा: बोर अभयारण्याच्या “कवडस (नवेगांव)” येथील नविन प्रवेशद्वाराचे उद्घाटन व लोकार्पण
Hingna, Nagpur | May 9, 2026 बोर अभयारण्याच्या “कवडस (नवेगांव)” येथील नविन प्रवेशद्वाराचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. या नव्या प्रवेशद्वारामुळे वनपर्यटकांना मुख्य रस्त्यावरून थेट बोर अभयारण्यात प्रवेश करता येणार असून, त्यामुळे पर्यटकांची सोय अधिक सुलभ होणार आहे. वनपर्यटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच, वनविभागामार्फत या नविन प्रवेशद्वाराची प्रसिद्धी करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.