पेण: पेण तालुक्याचे आरोग्य सुदृढ ठेवा
Pen, Raigad | Apr 23, 2026 पावसाळा तोंडावर आलायं, पावसाळ्यात साथीच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्या पार्श्वभूमीवर पेण तालुक्याचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आदेश जि.प. सभापती वैकुंठ पाटील यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. पेण येथे आयोजित आढावा बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुळकर, रोहा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका साळुंखे, पेण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील नखाते, सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत मढवी, जेएसडब्ल्यू सीएसआर विभाग अधिकारी सुधीर तेलंग उपस्थित होते.