सेलू: मोई येथे ऊसने दिलेले १० हजार रुपये मागण्यास गेलेल्या महिलेला धमकी; दोन महिलांविरुद्ध सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Nov 12, 2024 उसने दिलेले 10 हजार रुपये मागण्यास गेलेल्या महिलेशी वाद करून पतीला फसविण्याची धमकी देण्याची घटना मोई येथे ता. 11 सोमवारी दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अनिता प्रवीण बोंदाडे वय 29 रा. मोई यांनी दीक्षा भगत व संध्या भगत या दोघींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती ता. 12 ला सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.