सेलू: जुवाडी येथे एसएलआर जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ, पहिल्याच दिवशी मिळाला ७ हजार २६१ रुपये प्रति क्विंटल भाव
Seloo, Wardha | Nov 11, 2024 कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी उपबाजारपेठ सेलू अंतर्गत येत असलेल्या जुवाडी येथील एस.एल.आर. जिनिंग अँड प्रेसिंगमध्ये आज ता. 11 सोमवारी सकाळी 11.30 वाजता कापूस खरेदीचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगारे यांचे शुभहस्ते व विदर्भ कॉटन असोशियशनचे अध्यक्ष भावेशभाई शहा, सेक्रेटरी इरफान खोजे, नगरपंचायत सेलूचे गटनेता शैलेंद्र दफ्तरी, हमीदअली सय्यद, राजेंद्र मिश्रा, शिवसेना तालुका प्रमुख अमर गुंदी, गिरीश राठी, सरपंच चापले, पोलीस पाटील अभिजित वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत