सेलू: बोलीत सोयाबीनला कमी भाव लागल्याने सिंदी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचा गोंधळ, सोयाबीनचा लिलाव स्थगित
Seloo, Wardha | Nov 11, 2024 सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिंदी येथील बाजारपेठेत सोयाबीनला कवडीमोल भाव लागल्याने शेतकऱ्याने याविरोधात मार्केटयार्डमध्ये चांगलाच गोंधळ घातला. ही घटना आज सोमवार ता.११ ला दुपारी २.३० वाजता घडली. त्यामुळे बाजार समितीची लिलाव बोली स्थगित करावी लागली.