सेलू: जामनी येथे 65 वर्षीय महिलेसह तिच्या परिवाराला मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Nov 12, 2024 दारू पिऊन अश्लील शिवीगाळ करून एका 65 वर्षीय महिलेला आणि तिच्या मुलाला व सुनेला एकाने मारण्याची धमकी दिली. ही घटना ता.11 सोमवारी सायंकाळी 5 वाजता तालुक्यातील जामनी येथे घडली. याप्रकरणी ता. 12 मंगळवारला सकाळी 11 वाजता पंचफुला नामदेव येलोरे वय 65 रा. जामनी यांनी शंकर सायरे रा. जामनी याचे विरुद्ध तक्रार दाखल केली. अशी माहिती सेलू पोलिसांकडून मिळाली.