पेण: रायगडात पोलीसपाटील पदाची १ हजार पदे रिक्त
Pen, Raigad | Jun 25, 2026 ग्रामीण भागातील महत्वाचा दुवा पोलिस विभाग आणि जनता म्हणजे पोलिस पाटील. मात्र गेली 10 वर्ष पदे भरली नसल्याने 800 पोलिस पाटीलांवर अतिरिक्त कामाचा भार आहे.1 हजार पदे गेल्या 10 वर्षापासून भरली नाहीत तसेच गेल्या चार पाच महिन्याचे मानधन रखडले आहे. २०१२ ते २०१६ या कालावधीतील प्रवास भत्ता मिळावे. तसेच पोलिस पाटील यांची रिक्त पदे त्वरित भरावी आणि पीक पाहणी मध्ये पोलिस पाटील यांना सहभागी करुन घेऊ नये या मागण्यासाठी पोलिस पाटील संघटनेने जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना भेटून आपले निवेदन दिले आहे. पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे.