हिंगणघाट: राकॉपा शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस वांदिलेच्या निवेदनानंतर गडकरी यांच्या दणक्याने पुलावरील खडड्याच्या दुरुस्तीला वेग
राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौकातील उड्डाणं पुलावर एका वर्षात दोनवेळा पडलेल्या जीवघेण्या खड्ड्या बाबत पुराव्या सहित माहिती केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांना भेटून दिल्यानंतर नितीनजी गडकरी यांनी त्वरित राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यां ह्या उड्डाण पुलाबाबत माहिती देऊन सदर काम करणाऱ्या ठेकेदाराला ताबोडतोब ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचे आदेश दिले.ना गडकरी यांचा आदेश येण्याच्या आधी ज्या पद्धतीने थातूर मातुर काम सुरु होते ते बंद करून वरिष्ठ महामार्ग अधिकारी हें स्वतः भेट दिली.