हिंगणघाट: सेवाग्राम रुग्णालयातील रुग्णांच्या असुविधेदाचा आमदार समिरभाऊ कुणावार यांनी उपस्थित केला विधानसभेत मुद्दा
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिरभाऊ कुणावार यांनी सेवाग्राम दवाखान्यातील रुग्णांना होत असलेल्या असुविधेचा मुद्दा उपस्थित करीत याठिकाणी आपत्कालीन विभागात पूर्ण वेळ न्युरोसर्जन उपलब्ध नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. तसेच, ICU बेड्सचे नियोजनही अत्यंत अकार्यक्षम असून, रुग्णांच्या जीविताला त्यामुळे धोका निर्माण होत आहे.असे म्हणत दोन्ही प्रकरणे विधानसभेत उचलून धरत, मंत्री महोदयांना ठोस आणि तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.