जाफराबाद: न्यायालयाच्या आदेशावरून सुटलेला जेसीपी स्टेटस ठेवणे नडले,पोलीस ठाणे येथे वाळू माफियांना मागावी लागली माफी
आज दिनांक 7 मे 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद पोलीस ठाणे येथे दोन वाळूमाफियांना समस्त पोलीस दलाची माफी मागावी लागली आहे व तो व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे ,यामध्ये एक महिन्याभरापूर्वी हा जेसीपी ता.देऊळझरी येथे नदीपात्रात पकडण्यात आला होता मात्र न्यायालयाच्या आदेशावरून तो दोन दिवसापूर्वी सुटला मात्र काल पाच मे रोजी परमेश्वर बकाल आणि कैलास बकाल यांनी जेसीबी सुटल्याचा स्टेटस पोलिसांच्या विरोधात ठेवला आणि आज त्यांना माफी मागावी लागली.