रॅप सॉंगच्या वादातून खून; १० आरोपींना अटक, राजूनगरात पोलिसांनी काढली धिंड...
.
.
छत्रपती संभाजीनगर: रेल्वे स्टेशनजवळील राजूनगर परिसरात दारूच्या नशेत रॅप सॉंग (Rap Song) गाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून शेखर लहाने उर्फ ‘पिया’ या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खळबळजनक खून प्रकरणाचा छडा लावत वेदांतनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत १० आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्र फिरवली आणि सर्वच्या सर्व १० आरोपींना अटक केली. एवढ्यावरच न थांबता, पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी या सर्व आरोपींची भर राजूनगर परिसरात आणि घटनास्थळावर भरपूर पोलीस बंदोबस्तात जाहीर 'धिंड' काढली.आरोपींना गुन्ह्याच्या ठिकाणी फिरवून पोलिसांनी नागरिकांना आणि गुन्हेगारांना एक कडक संदेश दिला आहे की, "कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही." पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजूनगर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती आणि पोलिसांच्या या 'सिंघम' स्टाईल कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. गुन्हेगारांचे मनोधैर्य खचवण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
.
.
.
#ChhatrapatiSambhajinagar #CrimeNews #PoliceAction #VedantnagarPolice #MurderCase #LawAndOrder #BreakingNews #CrimeUpdate #SambhajiNagarPolice #policeraid
Haveli, Pune | Jul 2, 2026