सेलू: बाजार समितीकडून लिलावाद्वारे कापूस खरेदीचा शुभारंभ; 7 हजार 321 रुपये क्विंटलने सरसकट खरेदी
Seloo, Wardha | Nov 14, 2024 सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू येथील उपबाजारपेठेत आज ता. 14 नोव्हेंबर गुरुवाराला सकाळी 11.30 वाजता लिलाव पद्धतीने कापूस खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगारे यांचे हस्ते करण्यात आला. शुभारंभदिनी 7321 रुपये प्रति क्विंटलने सरसकट कापूस खरेदी करण्यात आला. यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.