शिरूर नगर परिषद निवडणुकीत चांगलाच गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आले आहे. विद्यमान आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यात मतदान केंद्राबाहेर शाब्दिक चकमक झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. याप्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
घटना अशी की, विद्यमान आमदार माऊली कटके हे मतदान केंद्रात प्रवेश करताच माजी आमदार अशोक पवार आक्रमक झाले. मतदार नसताना मतदान केंद्राच्या आत प्रवेश करता येत नाही, असा नियम असल्याचे सांगत पवार यांनी कटके यांना आक्षेप नोंदवला. यावर दोघांमध्ये शब्दांचे खडाजंगी युद्ध रंगले. उपस्थित कार्यकर्ते आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती माजी आमदार अशोक पवार यांनी दिली. त्यामुळे शिरूर नगर परिषद निवडणुकीतर्फे निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
#ShirurElection #MouliKatke #AshokPawar #ElectionDispute #PuneNews #MaharashtraPolitics #PollingStation #PoliticalClash #BreakingNews #LocalBodyElections
Haveli, Pune | Jul 29, 2026