सावनेर: नागपूर मेट्रोचा विस्तार कोराडी मार्गे दहेगाव रंगारी ते खापरखेडा पर्यंत व्हावा-आमदार डॉ आशिष देशमुख
Savner, Nagpur | Apr 26, 2026 नागपूर मेट्रोचा विस्तार कोराडी मार्गे दहेगाव, रंगारी ते खापरखेडा पर्यंत व्हावा यासाठी माझे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. सावनेर-खापरखेडा परिसरातून शहराकडे येणाऱ्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मेट्रो सेवा अत्यंत गरजेची आहे.तसेच, NMRDA च्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ग्रीन बसेसची सेवा सावनेरपर्यंत वाढविण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल, यासाठीही मी प्रयत्नशील आहे