पेण: मध्यधुंद डंपर चालकाने दोन दुचाकीस्वारांना चिरडले
Pen, Raigad | Jun 1, 2026 मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा परिसरात अवैद्य पद्धतीने ओव्हरलोडेड गौण खनिज वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांसह अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास नकार देत सुमारे दीड तास दोन्ही मृतदेह रस्त्यावरच होते यावेळी अवैद्य ओव्हरलोडेड गौण खनिज वाहतुक ही पेण उपप्रादेशिक विभाग आणि महसूल विभागाच्या छुप्या पाठिंब्यामुळेच होत आहे.