सेवा संकल्प अभियानांतर्गत मौजे बोरगाव बुद्रुक तालुका केज जिल्हा बीड येथे सर्व रोग निदान शिबिर
2.2k views | Jalna, Maharashtra | Oct 10, 2026 बीड... मा.ना. प्रकाश आबिटकर साहेब आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून "माझ गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान अंतर्गत 'सेवा संकल्प अभियान' मौजे बोरगाव बुद्रुक तालुका केज जिल्हा बीड येथे उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड मॅडम यांच्या सूचनेनुसार मा. जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हास गंडाळ सर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश कुमार सोळुंके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोग निदान शिबिर ठेवण्यात आले, त्यामध्ये जिल्हा रुग्णालय बीड येथील सर्व तज्ञ डॉक्टरांची टीम पाठवून त्यामध्ये सर्व रोगांवर तपासणी करण्यात आली गरजू रुग्णांना उपचार करण्यात आले क्षयरोग, कुष्ठरोग, डोळे,कान नाक घसा तपासणी, हाडाची तपासणी,मानसिक आजार, त्वचा रोग,गरोदर मातांची स्तनदा मातांची तपासणी, सर्वसाधारण तपासणी, इसीजी एक्स-रे तपासणी, थुंकी तपासणी रक्त लघवी तपासणी करून आरोग्य बाबत करण्यात आली. डॉ. रेखा गायकवाड मॅडम यांनी आपल्या भाषणांमधून आजार होऊन बरा करण्यापेक्षा होऊच नये म्हणून प्रयत्न केला पाहिजे वेळेवर झोपणे सकाळी लवकर उठणे मोबाईलचा कमी वापर, शारीरिक व्यायाम, योगा या सर्व बाबींवर भर देण्यासाठी युवा पिढीला आवाहन केले. गावातील सरपंचानी आणि नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले या सेवा संकल्प शिबिरास यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरावरून डॉ. संजय कदम अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. तांदळे बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी, डॉ. नेहरकर ए.डी.एच.एस. लेप्रसि, डॉ. माने जिल्हा क्षयरोगाधिकारी, मजीद शेख जिल्हा वि. व माध्यम अधिकारी, डॉ.राहुल मुंडे तालुका आरोग्य अधिकारी केज, डॉ. बालाजी लोमटे, डॉ. शहाजी लोमटे डॉ. संजीवनी गव्हाणे, डॉ.शिला कांबळे मॅडम, डॉ. केशव इंगोले अधिकारी कर्मचारी सर्व समन्व्यक यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतल