भिवापूर: चिखलीवासीयांचा प्रशासना विरोधात उपोषणाचा आज तिसरा दिवस
भिवापूर चिखली रोहना या अत्यंत महत्वाच्या मार्गाची पुर्णता चाळण झाली असून शासन आणि प्रशासनाचे पुर्णतः दुर्लक्ष होत आहे त्यामुळे संतप्त चिखली वासीयांनी अखेर प्रशासनाविरोधात लढा देत उपोषण सुरु केले आहे चिखलीच्या सरपंचा प्रणाली गारघाटे यांच्या नेतृत्वात १७ मे पासून गागावाच्या मुख्य मार्गावर उपोषण सुरु केले आहे रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरु होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षीतिपणामुळे या मार्गाची पुर्णता वाट लागली आहे