अंधेरीत एका हॉटेलला पहाटे भीषण आग, अग्निशामक दलाने ३५ जणांना सुखरूप काढले बाहेर
आज दिनांक 26 मे 2025 वेळ पहाटे तीन वाजता च्या सुमारास अंधेरी पूर्व परिसरातील चकाला येथील हॉटेल ज्योती या ठिकाणी आगीची घटना समोर आली असून अग्निशामक दलाच्या पाच ते सहा गाड्या दाखल झाल्यानंतर हॉटेलमधील 35 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे आता या घटनेची चौकशी केली जात असून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.