पेण: महिला माहेरी आली, जुन्या मित्रांना भेटली, पण त्यांनीच घात केला
Pen, Raigad | Jun 11, 2026 हमरापूर परिसरातील शितोळेवाडी हद्दीत झाडाझुडपात अर्धनग्न अवस्थेत आढळून आलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा अवघ्या 24 तासांत करण्यात पेण पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांच्या तत्पर तपासामुळे गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात आला आहे.