श्रीवर्धन: नियोजनाअभावी श्रीवर्धन तालुका तहानलेला
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच श्रीवर्धन तालुक्यात अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे नागरिकांच्या घशाला कोरड पडली असताना दुसरीकडे अनेक ग्रामपंचायतींमध्ये पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन झाले नसल्याचे चित्र समोर येत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याच्या स्रोतांची पूर्वतयारी करण्यात प्रशासन आणि संबंधित ग्रामपंचायती कमी पडल्याचे दिसून येत आहे.