कल्याण: कल्याण येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरती
Kalyan, Thane | Jul 6, 2025 आज आषाढी एकादशी निमित्त सर्वत्र पांडुरंगाचा जयजयकार होत आहे लाखो भक्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात आहेत मात्र ज्यांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाणे शक्य नाही ते ठीक ठिकाणी प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेत असतात. कल्याणच्या बिर्ला कॉलेज येथे देखील विठ्ठल रुक्माई च्या मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी शिंदे यांनी ज्ञानदिंडीचे कौतुक करत सर्वांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या.