Pune MPSC Student Protest : रात्री १० वाजताही MPSC विद्यार्थ्यांचा जोश कायम! पुण्यात आंदोलनस्थळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष
पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रात्री १० वाजताही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनस्थळी ठामपणे उभे आहेत.
आंदोलनाच्या ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक राजकीय नेतेही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत.
#MPSC #MPSCAandolan #MPSCStudents #Pune #PuneNews StudentProtest ChhatrapatiShivajiMaharaj MaharashtraNews LiveUpdates TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Oct 11, 2026