शहरातील बार्शी नाका रोडवरील सोमेश्वर मंदिर पुलाजवळ असलेल्या मुख्य पाईपलाईनला मोठी गळती लागल्याने आज सकाळपासून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या गळतीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र गळती मोठी असल्याने पाणी प्रवाह थांबेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे.