पेण: मुंबई-गोवा महामार्गावर अखेर टोल सुरु; शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाला यश
Pen, Raigad | May 17, 2026 मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून अजूनही अनेक ठिकाणी काम अर्धवट असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पेण तालुक्यातील खारपाडा येथील टोल नाका आजपासून (15 मे) सुरू केल्याने स्थानिकांना टोल माफी मिळावी याकरिता शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील एम एच शुन्य सहा नोंदणीकृत असलेल्या स्थानिक वाहनांना टोल मुक्ती देण्यात येणार असल्याचा तसेच येथील स्थानिक तरुणांना टोलनाक्यावर नोकरीत सामावून घ्यायचा निर्णय होताच सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.