शहादा: जुनी पोस्ट गल्ली मधील चंडिका कलेक्शन समोर राहणाऱ्या एकाच्या घरातून १० हजार ५९० रुपये किमतीचा सुका गांजा जप्त
शहादा शहरातील जुनी पोस्ट गल्ली मधील चंडिका कलेक्शन समोर राहणाऱ्या एकाच्या घरातील पहिल्या मजल्यावरील मागील रूममधून 10 हजार 590 रुपये किंमतीचा सुका गांजा व तीन हजार रुपये किमतीचा वजन काटा आणि 20 रुपये किंमतीच्या पिना असा एकूण 13610 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई करण्यात आली असून शहादा पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस शिपाई विजय धनसुकलाल ढिवरे यांच्या फिर्यादीवरून सुनील प्रताप चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.