हिंगणघाट: साखरा गावात ऐन अंत्यसंस्कारावेळी छत कोसळले, नातेवाईकांची धावपळ; स्मशानशेडची तातडीने दुरुस्तीची मागणी
साखरा येथील मोक्षधामात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना यावेळी अचानक स्मशानभूमीचे छत कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाहीय मात्र या घटनेने गावातील एकच खळबळ उडाली या शेडची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी उपसरपंच कमलेश भोयर यांनी साखरा येथील अजब मारुती बुदे यांचे निधन झाले. निधनानंतर नातेवाईक घरी पोहोचू लागले. मंगळवारी दुपारच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली.मृतदेहाला मुखाग्नी दिल्यानंतर काही वेळातच अचानक स्मशानभूमीचे छत कोसळले.